नवी दिल्ली – जर आपण आठवी, दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असाल आणि भारतीय सैन्यात सैनिक म्हणून रुजू होण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय सेना आपल्या भरती मुख्यालय जालंधर कॅंट येथे ४ ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान भरती करणार आहे. जालंधर, कपूरथला, होशियारपूर, शहीद भगतसिंग नगर आणि तारण जिल्ह्यातील उमेदवार यात सहभागी होऊ शकतात.
सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख २८ डिसेंबर २०२० आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना प्रवेश पत्र २९ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ पर्यंत त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविली जाणार आहे.
या भरती अंतर्गत सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर लिपिक या विविध प्रकारच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर संबंधित पात्रता वेगवेगळ्या श्रेणींसाठी नमूद करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम भारतीय सैन्याचे भर्ती पोर्टल joinindianarmy.nic.in येथे भेट द्यावी. मुख्य पेजवर भरती संदर्भात असलेल्या जाहिरातीवर क्लीक करावे. त्याच वेळी नोंदणीवर क्लिक करून, आपण शोधलेली माहिती प्रविष्ट करा आणि यानंतर आपण पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.