नवी दिल्ली – राष्ट्रीय चिन्ह, प्रतिके किंवा ऐतिहासिक वास्तू यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असते, परंतु काही वेळा याचा सर्वांनाच विसर पडतो. भारतीय संसदेच्या भव्य इमारतीला आज १२ फेब्रुवारी रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु या ऐतिहासिक क्षणाची फारशी कोणालाही आठवण राहिली नाही.
हा क्षण काल निघून गेला, परंतु राजकीय क्षेत्रातील अनेक लोकांच्या मनात बद्दल कोणतीही भावना जाणवत नव्हती. देशाच्या संसद भवनाच्या इमारतीचा पाया १०० वर्षा पुर्वी ब्रिटनच्या ड्यूक ऑफ कॅनॉटने घातला होता आणि त्यांनी या वास्तूचे वर्णन भारताच्या पुनर्जन्मचे प्रतीक म्हणून केले होते. विशेष म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या २६ वर्षांपूर्वी त्यांनी ही टिप्पणी केली होती.
-
इतिहासाचे प्रतिक : भूतकाळाशी संबंधित विशेष क्षण काही वेळा विसरले जातात. त्याच दिवशी बरोबर १०० वर्षांनंतर शुक्रवारी संसद अधिवेशन सुरू होते, लोकसभा आणि राज्यसभेत काम चालू होते, आता हा प्रसंगही विशेष होता, कारण भविष्यातील संसद काही अंतरावर बांधण्यास सुरूवात झाली आहे आणि काही वर्षानंतर सध्या अस्तित्त्वात असलेली इमारत इतिहासाचे प्रतिक असेल.
-
संसद भवनाचा नकाशा बेकर, लुटीन्स तयार केला : विद्यमान संसद भवनाचा नकाशा सर एडविन लुटियन्ससमवेत प्रसिद्ध डिझायनर सर हर्बर्ट बेकर यांनी तयार केला होता. त्याच सर लुटियन्स ज्यांनी रायसीना हिलच्या सभोवताल नवी दिल्लीची निर्मितीची संकल्पना मांडली होती.
-
दिल्ली बनली ब्रिटीश राजवटीची राजधानी: स्वातंत्र्यापूर्वी दिल्ली ही ब्रिटीश राजवटीची राजधानी बनली होती. त्याचवेळी संसद भवनाची पायाभरणी ड्यूक ऑफ कॅनॉटने केली. त्याच्या जवळच कॅनॉट प्लेस मार्केट हे प्रिन्स आर्थरच्या ड्यूक ऑफ कॅनॉटच्या नावाने बांधले गेले होते, हा परिसर व बाजारही नवी दिल्लीचा भाग म्हणून बांधला गेला होता. प्रिन्स आर्थर हे ब्रिटीश साम्राज्याचे किंग जॉर्ज पंचम यांचे काका होते. दिल्लीचे महत्त्व लक्षात घेऊन ते म्हणाले होते की, भारताच्या राजधानीला रोमच्या राजधानी अथेन्सइतकेच महत्त्व दिले जावे.
-
पायाभरणीच्या वेळी झाला होता भव्य सोहळा : प्राचीन अभिलेख व इतिहासावरून असे कळते की, संसद भवनचा पायाभरणीच्या वेळी भव्य सोहळा पार पडला होता. तत्कालीन व्हायसराय लॉर्ड चेम्सफोर्डने तेथील ब्रिटीश राजवटीला मान्यता देणार्या रशियाच्या प्रमुखांनाही आमंत्रित केले होते. ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी या समारंभासाठी खास भाषण तयार केले. ते म्हणाले होते की, सर्व महान राज्यकर्ते, सर्व महान लोक आणि सर्व मोठ्या सभ्यता यातून मोठा इतिहास बनविला जातो.
-
पार्लमेंट हाऊसच्या बांधकामासाठी कोट्यवधी टन लाल दगड, चुना, वाळू आदी वापरण्यात आले. सहा वर्षांनंतर १९२७ मध्ये ही इमारत पूर्ण झाली. त्यानंतर त्याचे नाव कौन्सिल हाऊस ठेवले गेले. पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा या इमारतीला संसद भवन असे नामकरण केले गेले. स्वतंत्र भारताचे सर्व प्रमुख निर्णय येथे घेण्यात आले. १४४ खांब असलेली ही इमारत जगातील सर्वात भव्य संसद इमारतींपैकी एक आहे.