मुंबई – कोवीडच्या काळया छायेतून बाहेर येतांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि खासकरून या मंडळाचा सर्वेसर्वा सौरभ गांगुलीने पुढाकार घेतल्याने वाळवंटातील आयपीएल आत्तापावेतो यशस्वी रित्या पार पडली आहे. आता पुढे जावून भारतीय संघ ऑस्टेलीया दौ–यावर रवाना होतो आहे. या दौ–यात ४ कसोटी, ३ वन–डे आणि २०–२० षटकांचे ३ सामने असा भला मोठा प्रोग्राम तयार आहे. सुमारे दोन महीन्यापेक्षा जास्त कालावधीचा हा भला मोठा दौरा भारतीय क्रिकेटसाठी एक महत्वाचा दौरा ठरणार असून, आज या दौ–याच्या २०–२० षटकांचे सामने खेळणा–या संघाची निवड निश्चीत करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या आयपीएल मधील वैयक्तीक कामगिरीच्या आधारावर काही खेळाडू या संघात निवडले गेले आहेत. राजस्थान रॉयल्सतर्फे सातत्याने धावा करणा–या संजु सॅमसनला अंतीम १६ खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले असून कोलकाता नाईट रायडर्ससा लेग स्पिनर वरूण चक्रवर्तीची एका सामन्यातील मोठया कामगिरीच्या आधारावर या दौ–यासाठी आश्चर्यकारकरित्या
निवडलेला संघ पुढील प्रमाणे –
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, के.एल.राहूल, श्रेयस अयर, मनिष पांडे, हार्दीक पांडया, संजु सॅमसन, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी, नवदीप सैनी, दिपक चहर, वरूण चक्रवर्ती