मुंबई – अमेरिकेने २०२४ मध्ये चंद्रावर जाणाऱ्या अंतरीक्ष मोहिमेसाठी १८ अंतराळवीरांची निवड निश्चित केलेली आहे. यात भारतीय वंशाचे राजा चारी यांचा देखील समावेश आहे. या १८ सदस्यीय अंतराळदलात महिलांचासुद्धा समावेश आहे. फ्लोरिडामध्ये नासा च्या केनेडी स्पेस सेंटर मध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी या दलाचा परिचय करविला. राजा चारी हे २०१७ मध्ये अमेरिकाचा अंतराळवीरांच्या दलात सहभागी झाले होते. तेव्हापासून त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. याच क्षेत्रात स्नातक पदवी प्राप्त केलेले चारी यांचे पिता श्रीनिवास हे हैदराबादवरून अमेरिकेला जाऊन स्थायिक झाले होते.
आजही त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य भारतात राहतात. भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांच्या नंतर राजा चारी हे तिसरे भारतीय वंशाचे अंतराळवीर असतील जे चंद्रावर पाउल ठेवतील. या मोहिमेचे प्रमुख अंतराळवीर असलेले पेट फॉरेस्टर यांनी सांगितले की चंद्रावर पाउल ठेवणे आणि त्याच्या धरतीवर फिरणे हे त्यांचे वर्षानुवर्षांपासुंचे स्वप्न आता पूर्ण होऊ घातले आहे.
उपराष्ट्रपति माईक पेन्स यांनी जाहीर केले की यावेळी चंद्रावर पहिले पाउल एक महिला ठेवेल आणि त्यानंतर पुरुष अंतराळवीर चंद्रावर उतरतील. पेन्स यांच्या मते हे १८ लोक अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेचे भविष्य आहेत. नासाच्या २०२४ च्या चंद्र मोहिमेच्या कार्यक्रमानुसार येत्या दहा वर्षांत चंद्रावर एक स्थायी निवासस्थान बनवून एक मानव त्या ठिकाणी कायम स्वरूपी वास्तव्यास राहील अशी व्यवस्था होणार आहे.
अंतरिक्ष टीम च्या १८ सदस्यांमध्ये जोसेफ अकाबा, कायला बैरोन, मैथ्यू डोमिनिक, विक्टर ग्लोवर, वॉरेन होबर्ग, जॉनी किम, क्रिस्टीना हैमॉक कोच, केजेल लिंडग्रेन, निकोल ए मान, ऐनी मैकमैन, जेसिका मीर, जैस्मीन मोगबेली, केट रूबिन्स, फ्रैंक रुबियो स्कॉट टिंगल, जेसिका वॉटकिंस आणि स्टेफनी विल्सन यांचा समावेश आहे.