न्यूयॉर्क – मूळ भारतीय वंशाची असलेली अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिची अमेरिकेच्या प्रतिष्ठीत टाइम मासिकाने ‘किड ऑफ द इयर’ म्हणून निवड केली आहे. १५ वर्षीय राव हिला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचा हा सन्मान करण्यात आला आहे.
गीतांजलीने सायबर गुंडगिरी ओळखण्यासाठी अॅप तयार केले आहे. याशिवाय दूषित पाणी आणि अफूच्या व्यसनाच्या क्षेत्रातही त्यांनी आपले तांत्रिक योगदान दिले आहे. यंदा टाईम मासिकाने प्रथमच प्रतिभावान मुलांच्या निवडीचे आयोजन केले होते. आशावादी वैज्ञानिक आणि संशोधक गीतांजली राव यांची ‘किड ऑफ द इयर’ च्या पाच हजाराहून अधिक नामांकनांमधून निवड झाली. टाईमच्या सध्याच्या अंकात गीतांजलीला कव्हर पेजवर स्थान देण्यात आले असून हॉलिवूड अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ते अँजेलीना जोली यांनी तिची मुलाखत देखील घेतली आहे. टाईम मासिकाने राव हिच्या प्रतिभेचे कौतुक केले आहे.
दरम्यान, राव हिने याबद्दल म्हटले आहे की, सध्याच्या पिढीला ज्या समस्या भेडसावत आहे त्याआधी कधीही पाहिल्या नव्हत्या. परंतु मानवी अस्तित्वाच्या समस्या जुन्या असून अजूनही अस्तित्वात आहेत.
तिच्या कोलोरॅडोच्या घरातून दिलेल्या एका ऑनलाइन मुलाखतीत गीतांजलीने अँजेलिना जोलीला सांगितले की, आपल्याला ज्या गोष्टीची जास्त चिंता आहे ती सोडविली पाहिजे. प्रत्येक समस्येचे निराकरण करणे शक्य नसल्यामुळे. तर कोणतीही छोटी समस्या असल्यास ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. जसे की कचरा उचलण्याचा सोपा मार्ग शोधणे.
राव पुढे म्हणाली की, ती पारंपारिक वैज्ञानिकांसारखी दिसत नाहीत. कारण आतापर्यंत तीने टीव्हीवर पांढरे केसांचे वृद्ध वैज्ञानिक पाहीले आहेत. पण नव्या पिढीने वैज्ञानिक संशोधनात आवड दाखवावी, परंतु असे दिसते की, प्रत्येकाला लिंग, वय आणि त्वचेच्या रंगांवर आधारित भूमिका देण्यात आल्या आहेत. तसेच गीतांजलीने सांगितले की, तिला बेकिंगमध्ये जास्त वेळ काम करणे आवडते.