जगातील ५७ देश भारतासोबत
या प्रयत्नांत जगातील ५७ देश भारतासोबत आहेत आणि यातील ३५ देश सर्वांत कमी विकसित आहेत. अर्थात अमेरिका आणि युरोपातील अनेक विकसित देश या निर्णयात भारताच्या बाजूने नाहीत. इटलीने आक्सफोर्ड–एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीचे २.५ लाख डोजेस आस्ट्रेलियात निर्यात करण्यावर बंदी घातली. युरोपीय संघानेही इटलीच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
भारतातून सर्वाधिक निर्यात
तज्ज्ञांनुसार व्हॅक्सीनवरून जगभरातील विकसित देशांची भूमिका लक्षात घेता भारतातूनच सर्वांत मोठी निर्यात होण्याची दाट शक्यता आहे. जगातील जास्तीत जास्त देशांना लस पुरविणारा देश म्हणून भारत पुढे येण्याची शक्यता आहे. त्यासाठी ट्रिप्समधून व्हॅक्सीनला बाहेर ठेवण्याची गरज असल्याचे केंद्रीय उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.
व्हॅक्सीनची निर्मिती सहजरित्या
फेब्रुवारीच्या अखेरीस डब्ल्यूटीओने म्हटले होते की व्हॅक्सीनला ट्रिप्सच्या बाहेर ठेवले नाही तर खरबो डॉलरच्या वैश्विक उत्पादनाचे नुकान होईल. त्यामुळे व्हॅक्सीनला ट्रिप्सच्या बाहेर ठेवले तर निर्मितीही सोपी होईल. मात्र सध्या तरी युरोप, जपान आणि अमेरिकेचा अडथळा कायम आहे. जगभरातील २५पेक्षा अधिक देश भारताकडे व्हॅक्सीनची मागणी करीत आहेत.