नाशिक – भारतीय योग संस्थान राष्ट्रीय कार्यालय , नवी दिल्ली या संस्थेच्या अधिपत्य खालील नाशिक जिल्हा पदाधिकारी यांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख म्हणून मिलिंद जाजू यांची निवड करण्यात आली. जिल्हा मंत्री अनिल जोगळेकर, जिल्हा संघटन मंत्री सुवर्णा गुजर, क्षेत्रीय प्रमुख श्रद्धा कुलकर्णी (इंदिरानगर), रश्मी उगले (अशोका मार्ग), क्षेत्र मंत्री (इंदिरानगर ) कमल झवर (अशोका मार्ग ) सुधीर उगले (नाशिक शहर ) यांची निवड झाली आहे.
भारतीय योग संस्थान या संस्थेच्या वतीने इंदिरानगर ,सिटी गार्डन, डी.जी.पी.नगर, टागोर नगर, डे केअर सेंटर येथील शाळा, गोविंदनगर तसेच अशोका मार्ग येथे कल्पतरूनगर, व वृंदावननगर, भाभा नगर आदी ठिकाणी सकाळी योग वर्ग सुरू होते. कोव्हीडमुळे प्रशासनचे आदेशानुसार वर्ग बंद करण्यात आले आहेत. आता प्रशासनाची परवानगी घेऊन सर्व नियमांचे पालन करीत अत्यधूनिक प्रणालीनुसर गूगल मीटवर नियमित योग अभ्यास सुरू करण्यात आला आहे. आंतर राष्ट्रीय योग दिना निमित्त रोग निवारण शिबिर घेण्यात आले होते. त्यास मोठा प्रतिसाद लाभला होता. संस्थान तर्फे हिंदी इंग्रजी भाषा तील योग मंजिरी नावाचे मासिक प्रकाशित होत असते . या संस्थानचे कार्य १९६७ पासून निःशुल्क सुरू आहेत. तसेच देशभरात ३५०० पेक्षा जास्त शाखा सुरू आहेत. २३ पेक्षा जास्त प्रांत आणि परदेशात सुद्धा सुरू आहे. वर्ष चे ३६५ दिवस योग वर्ग सुरू असतात. सद्या कोव्हीडमुळे प्रशासनच्या आदेशानुसार प्रत्यक्ष जागेवर वर्ग न होता साधक त्यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क लाऊन करीत आहे. आभासीपद्धतीनुसार. तज्ञांचे मार्गदर्शन नुसार व डेमो सह. योग प्रेमी सह साधक याना खूपच फायदा होतो आहे.आरोग्यचे दृष्टीने लाभदायक असते. अशी माहिती योग शिक्षक व समन्वयक सुधाकर गायधनी यांनी दिली.