नाशिक – सध्या पावसाळा असल्याने अनेक ठिकाणी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला जात आहे. मात्र, कुठली रोपे याविषयी फारशी जनजागृती नाही. त्यामुळे पक्षी आणि जैविक विविधतेला उपयोगी ठरणाऱ्या बहुगुणी भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. यासाठीच निसर्गप्रेमी मनिष बाविस्कर यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड वाढावी यासाठी त्यांनी रोपे मोफत देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यांना तातडीने ९८३४०२८५९९ या क्रमांकावर संपर्क करावा. तसे आवाहन बाविस्कर यांनी केले आहे.