अहमदाबाद – भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर १ डाव २५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड संघासोबत होईल.
पहिल्या डावात इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवल्यानंतर, दुसऱ्या डावात भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. आणि इंग्लंडचा डाव केवळ १३५ धावावर संपला.
अक्षर पटेल आणि आर आश्निनने प्रत्येकी ५ गडी बाद केले आणि केवळ तिसऱ्या दिवशीच भारताने हा विजय प्राप्त केला.
भारताच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकवणारा भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.