न्यूयॉर्क – इस्लामिक स्टेटचे नवे प्रमुख शिहब अल मुहाजीर हे भारतात दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार असून पाकिस्तानमधील हक्कानी नेटवर्कशी देखील त्याचा संबंध आहे. या कारवायामुळे दहशतवाद्यांचे धोकेही वाढत असून दहशतवादी हल्ला देखील होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्र संघाचा अहवालात नमूद केले आहे.
इस्लामिक स्टेट इन लेव्हंट-खोरासन बद्दलचा अहवाल यूएनचे सरचिटणीस अँटोनियो ग्वाटेरेस यांनी दिला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, या संघटनेचे नवे प्रमुख शिहाब अल मुहाजीर बनले असून आयएसआयएल-के ही संस्था इस्लामिक स्टेट म्हणून देखील ओळखली जाते.
भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि मालदीवमधील दहशतवादी कारवायांची ही जबाबदारी आहे. त्याचे दोन हजाराहून अधिक सैनिक अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पसरलेले आहेत. अफगाणिस्तानातील प्रांतांमध्ये हिंसाचाराच्या मोठ्या घटनांमध्ये या संघटनेचे दहशतवादी सामील आहेत. या संस्थेने मे महिन्यात काबूल शहरात , ऑगस्टमध्ये जलालाबाद आणि नोव्हेंबरमध्ये काबुल विद्यापीठावर हल्ला केला. डिसेंबरमध्ये याच संघटनेने अफगाणिस्तानाच्या नानघरमध्ये एका महिला पत्रकाराची हत्या केली.
जून २०२० मध्ये शिहाब संघटनेचा नवा नेता म्हणून निवडला गेला. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे पाठबळ आहे. अशा परिस्थितीत भारतातील इस्लामिक स्टेटचे कामकाज चिंताजनक ठरू शकते. त्यातच सीरियामधील अतिरेक्यांच्या हाती रासायनिक शस्त्रे येण्याची शक्यता असल्याने भारतात मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकेल.