शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतात जन्मलेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता; नागरिकांच्या मानसिकतेत मोठा बदल

डिसेंबर 27, 2020 | 9:24 am
in संमिश्र वार्ता
0
NPIC 20201227144218

नवी दिल्ली – कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

यावेळी मोदी यांनी नागरिकांनी देशभरतून पाठवलेली पत्र, आणि माय जीओव्ही अॅप, तसंच दूरध्वनीवरून पाठवलेल्या संदेशांचा उल्लेख करत, त्यातली प्रेरणादायी उदाहरणं नागरिकांसमोर मांडली. यावेळी मोदी यांनी कोल्हापूरातल्या अंजली आणि मुंबईतल्या अभिषेक यांचाही उल्लेख केला. नव्या वर्षाच्या निमित्तानं देशाला शुभेच्छा द्याव्यात, या कोल्हापुरातल्या अंजली यांनी मांडलेल्या सूचनेचा त्यांनी उल्लेख केला.

२०२१मध्ये भारत यशाची नवी शिखरं पादाक्रांत करेल, संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि भारताचं स्थान अधिक सशक्त व्हावं यापेक्षा दुसरी कोणतीही इच्छा मोठी नाही असं ते म्हणाले. कोरोना काळात देशातल्या नागरिकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला, आणि ते भारतात उत्पादित झालेल्या वस्तुंची मागणी करू लागले, हा मोठा बदल असून, त्याचं मूल्यांकन करणं सोपं नाही असं ते म्हणाले.

विशाखापट्टणम इथल्या व्यंकट मुरलीप्रसाद यांचं उदाहरण देत आत्मनिर्भर भारतासाठी नागरिकांनी, आपण वापरत असलेल्या परदेशी वस्तुंच्या देशी पर्यायांची यादी तयार करावी आणि भारतातल्या कष्टकरी लोकांनी तयार केलेली उत्पादनेच खरेदी करायचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं. नागरिक अशा तऱ्हेनं आत्मनिर्भर भारताच्या संकल्पेला पाठिंबा देत असल्यानंच, व्होकल फॉर लोकल हा मंत्र घराघरात गजबजू लागला आहे, त्यामुळे आपली उत्पादने जागतिक दर्जाची असतील याची सुनिश्चिती करणं ही देशातल्या उत्पादक आणि उद्योजकांची जबाबदारी असल्याची जाणिव मोदी यांनी आजच्या मन की बातमधून करून दिली.

याच वर्षी काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच जीआय टॅग मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे काश्मीरी केशरची निर्यात वाढेल आणि त्यामुळे आत्मनिर्भर भारताला बळ मिळेल असं ते म्हणाले. देशभरात २०१४ ते १८ या काळात बिबट्यांची संख्या ६० टक्क्यानं वाढली, त्यासोबतच वाघ आणि सिंहांची संख्या तसंच वनक्षेत्रही वाढल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारसोबत नागरिक आणि इतर संस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाल्याचं ते म्हणाले.

अत्यंत संवेदनशीलतेनं प्राण्यांची सेवा करत असलेल्या व्यक्तींची उदाहरणं देत त्यांनी अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. एकदाच वापरायच्या प्लास्टिकपासून देशाला मुक्त करणं, हा नव्या वर्षासाठीच्या संकल्पांपैकीच एक असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मोदी यांनी यावेळी मोदी यांनी सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेसाठी झटत असलेल्या व्यक्तींची उदाहरणंही नागरिकांसमोर मांडून, आपण कचरा करणारच नाही, असा संकल्प करायचं आवाहन केलं.

आजच्या मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी गीता हा ग्रंथ उद्भूत का आहे हे उलगडून सांगत, मनातली जीज्ञासा जोपासण्यामागचं महत्वही विषद केलं. आपल्या मनातली जीज्ञासाच आपल्याला नव्या कामासांठी प्रेरणा देते असं ते म्हणाले. आपली संस्कृती, परंपरा वाचविण्यासाठी गुरु गोविंदसिंग, गुरु गोविंद यांचे पुत्र, साहिबाजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंग, मोतोश्री गुजरी यांच्या बलिदानाची आठवणही मोदी यांनी आजच्या मन की बातमधे केली.

श्रीगुरू तेग बहादुर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त दिल्लीतल्या रकाबगंज इथल्या गुरुद्वारात गुरु तेग बहादुर यांच्यापुढे नतमस्तक व्हायची संधी मिळाल्याचं सांगून, या सगळ्यांच्या बलिदानाला आपण नमन करत असल्याचं ते म्हणाले. देशभरातल्या शिक्षकांनी कोरोनाकाळात वापरलेल्या अभिनव पद्धती आणि शिक्षण सामग्री दीक्षा पोर्टलवर अपलोड करायचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या युवकांमधे ‘करू शकतो ‘ हा दृष्टिकोन आणि ‘करेन’ ही भावना असल्यानं  त्यांच्यासाठी कोणतंही आव्हान मोठं नसल्याचं ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहणार लशीपासून वंचित

Next Post

आंबोली घाटात कारमधून अवैध दारु वाहतूक, ५ लाख  ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
IMG 20201227 WA0006 1

आंबोली घाटात कारमधून अवैध दारु वाहतूक, ५ लाख  ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011