नवी दिल्ली : संपूर्ण देशाला कोरोना व्हायरस साथीच्या आजारापासून मुक्त करण्यासाठी लस विकसित करण्यात भारत जागतिक स्तरावर अग्रगण्य देशांमध्ये एक आहे. यावर सध्या सुरू असलेले काही संशोधन आता प्रगत टप्प्यावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी यासंबंधी माहिती देताना स्पष्ट केले की, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानांतर्गत कोरोना लसीकरणाचे काम देशभरात लवकरच सुरू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीत म्हटले आहे की, की राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देशातील प्रत्येक नागरिकास आरोग्य कार्ड दिले जाईल. डिजिटल हेल्दी आयडीचा वापर प्रत्येक नागरिकास लसीकरण (कोरोना लसीकरण) करण्यासाठी केला जाईल. दरम्यान,शास्त्रज्ञ पॅट्रिक वालेस यांनी असा दावा केला आहे की, कोरोना संक्रमण थांबविणे हे लसमुळे शक्य नाही. परंतु, संसर्ग कमी होईल . तर पंतप्रधान म्हणाले की, अनुभव आणि तरूण कौशल्यांच्या जोरावर भारत जागतिक आरोग्य सेवांच्या केंद्रस्थानी असेल. एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळात आपले सरकार इतर देशांनाही मदत करण्याची योजना आखत आहे. जागतिक लसीकरण कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लस पैकी ६० टक्के लस भारतात तयार केली जातात याची आठवण त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले की, भारत आधीच प्रभावी लस वितरण प्रणालीवर काम करत आहे. डिजिटल हेल्थ आयडी ही पुढची पायरी आहे. देशातील संपूर्ण लोकसंख्येची लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी आता डिजिटल नेटवर्कचा वापर केला जाईल.
कोविड -१९ मुळे देशातील बहुसंख्य लोक कोरेना संक्रमणाने ग्रस्त आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान म्हणाले की, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या तुलनेत भारत सुमारे चार पट जास्त आहे. आमच्या बर्याच राज्यांमध्ये लोकसंख्या युरोपियन देशांशी तुलना करता येते. असे असूनही, भारतात कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण कमी आहे. पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने कमी दिसून येत आहे. भारतातील बरे होण्याचा दर जगातील सर्वाधिक म्हणजे ८८ टक्के आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव होताच लॉकडाउनच्या अंमलबजावणीमुळे असे झाले. कोरोनाकाळात मास्क वापरण्यास प्रोत्साहित करणारा भारत हा पहिला देश होता.