नवी दिल्ली – भारतात गेल्या सात ते आठ महिन्यानंतर ऑक्टोबरपासून कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. कोरोना विषाणूची पहिली लाट देशात संपुष्टात येण्याचे संकेत देत आहेत. या संबंधी अधिक माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, ज्या पाच राज्यात जास्तीत जास्त रुग्णांची नोंद झाली आहे, तेथे रुग्ण बरे होण्याचा वेग आधिक आहे. देशभरात रविवारी कोरोनोपासून ६ दशलक्षाहून अधिक लोक बरे झाले आहेत.
सप्टेंबर महिन्यात भारतात रुग्ण संख्येत घट झाली आणि ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत बरे होण्याची जास्त प्रकरणे नोंदली गेली. २० सप्टेंबरपासून नव्या बाधितांच्या संख्येत घट होऊ लागली आणि भारतामध्ये दररोजच्या घटनांमध्ये घट दिसून आली. सुमारे ६ दशलक्ष प्रकरणांमधून ७ दशलक्ष केसेसपर्यंत पोहोचण्यासाठी 1१३ दिवसांचा कालावधी लागला. यातील बहुतेक प्रकरणे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधून नोंदली गेली. केरळ आणि कर्नाटक वगळता इतर सर्व राज्यांनी रुग्ण वाढीची प्रकार शिखरावर पोहोचलेले पाहिले आहे. आता सणासुदीच्या काळात तसेच हिवाळ्यामुळे रुग्ण वाढीच्या घटनांमध्ये कमी अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाने सण उत्सव दरम्यान सामाजिक अंतर कायम ठेवले पाहिजे, हे सुनिश्चित करण्यासाठी नवीन उपयोजना जाहीर केली आहे.