नवी दिल्ली – एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भारतात एका दिवसात बरे होणाऱ्या कोविड १९ रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत ५७ हजार ३८१ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचा दर ७० % च्या वर गेला आहे. तसेच ३२ राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर ५० % पेक्षा अधिक आहे. १२ राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दराचे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा अधिक आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे आणि गृह अलगीकरण (सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे रुग्ण), त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ लाखांपेक्षा अधिक झाली. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड १९ रुग्ण यांच्यातील अंतर वाढले आहे, सध्या ते ११ लाखांहून अधिक आहे.