मुंबई – 2G, 3G आणि 4G नंतर आता 5जी ने मार्केटमध्ये धडक दिली आहे. अश्यात स्मार्ट फोन कंपन्या देखील आपल्या युझर्सला दमदार इंटरनेट स्पीड उपलब्ध करून देण्यासाठी 5 जी स्मार्टफोन लॉन्च करीत आहेत. सध्यातरी मार्केटमध्ये केवळ महागड्या फोनमध्येत 5जी सपोर्ट आहे. मात्र युझर्समधील क्रेझ बघता कमी किंमतीतील 5जी फोन भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.
Realme X7 5G किंमतः 19,999 रुपये
Realme X7 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5जी सपोर्टशिवाय 64 एमपीची एआय रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप मुळेल. 6.4 इंचीचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 800U प्रोसेसर वर काम करतो. पॉवर बॅकअपसाठी यात 4,310mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Moto G 5G किंमतः 20,999 रुपये
हा स्मार्टफोन युझर्स फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. फास्ट परफॉर्मन्स देणारा 5जी रेडी स्मार्टफोन म्हणून याला ओळखले जाऊ लागले आहे. Moto G 5G ला Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर वर लॉन्च करण्यात आले आहे. याला 6.7 इंचीचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे आणि 48एमपीचा ट्रिपल रियर कॅमेरासेटअप देण्यात आला आहे.
OnePlus Nord किंमतः 24,999 रुपये
OnePlus Nord कंपनी चा अर्फोडेबल 5G स्मार्टफोन आहे. यात 48MP चा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 32MP + 8MP चा ड्युअल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. या स्मार्टफोनला Qualcomm Snapdragon 765G 5G प्रोसेसर वर लॉन्च करण्यात आले आहे.
Xiaomi Mi 10i 5G किंमतः 20,999 रुपये
Xiaomi Mi 10i 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि याची बेसिक किंमत 20,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 एमपीचा क्वार रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर वर काम करतो. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत युझर्सला 4820mAh ची बॅटरी मिळेल.