नवी दिल्ली – भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. देशातील ८ समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग मिळाला आहे. यूएनईपी, यूएनडब्ल्यूटीओ, एफईई, आययूसीएन या प्रख्यात सदस्यांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरीने पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणीकरण लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये शिवराजपूर (द्वारका-गुजरात), घोघला (दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (एपी), गोल्डन (पुरी-ओदिशा ) आणि राधानगर (अंदमान आणि निकोबार बेटे ) यांचा समावेश आहे.
किनारपट्टी प्रदेशातील प्रदूषण नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय ज्युरीकडून :(आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती) अंतर्गत भारताला तिसरे पारितोषिकही देण्यात आले आहे.भारताच्या ८ समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणीकरण बहाल केले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका ट्वीट संदेशात म्हटले आहे की, “एकाच प्रयत्नात ८ समुद्रकिनाऱ्यांसाठी अद्याप कोणत्याही ‘ब्लू फ्लॅग’ देशाला गौरवण्यात आलेले नाही हे लक्षात घेता ही उल्लेखनीय कामगिरी आहे. भारताच्या संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या प्रयत्नांना मिळालेली ही जागतिक मान्यता आहे” असे ते म्हणाले.