नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील माणक येथेही असेच एक अनोखे मंदिर आहे. उर्वरित मंदिरांमध्ये भक्तांना सहसा अर्पण म्हणून मिठाई किंवा काही खाद्यपदार्थ मिळतात. पण येथील माँ महालक्ष्मीच्या या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे भाविकांना नैवेद्य म्हणून सोन्या-चांदीचे दागिने व नाणी अर्पित केले जातात, तसेच या मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून सोन्या-चांदीचे नाणे देण्यात येतात.
माँ महालक्ष्मीच्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. देवीच्या चरणी लाखो रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम वाहण्यासाठी भाविक येथे येतात. दीपावलीच्या निमित्ताने धनतृयोदशीपासून पाच दिवस या मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी मंदिर फुलांनी नव्हे तर भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी व सोन्या – रूप्यांनी सजविले जाते.
दीपोत्सवाच्या वेळी मंदिरात कुबेरचे दरबार ठेवले जाते. या वेळी येथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दागिने व सोने , चांदीच्या (रुपयाचे ) पैसे दिले जातात. दीपावलीच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे चोवीस तास खुले असतात. असे म्हणतात की, धनतेरस येथे महिला भक्तांना कुबेरची प्रतिमा ( सिक्का ) दिला जातो. येथे येणारे कोणतेही भक्त रिकाम्या हाताने परत जात नाहीत. त्यांना प्रसादचे काही काही स्वरूप दिले जाते. मंदिरात दागिने व पैसे देण्याची परंपरा अनेक दशकांपासून चालू आहे. पूर्वी येथील राजे राज्याच्या समृद्धीसाठी मंदिरात पैशांची देणगी देत असत आणि आता भक्तही देवीच्या चरणी दागिने, पैसा इत्यादी अर्पण करीत असतात. असे मानले जाते की असे केल्याने आई लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांच्या घरात कायम राहतो.