सिडनी – कर्णधार विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा या तिन्ही फलंदाजांच्या जोरदार फटकेबाजी तर, धार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि थंगरसू नटराजनच्या अचूक माऱ्यामुळे भारताने लाज राखली आहे. त्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव केला आहे. भारताने दिलेल्या ३०३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ २८९ धावात गारद झाला. त्यामुळे ही मालिका २-१ अशी झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्यावतीने एरोन फिंचने सर्वाधिक ७५ आणि ग्लेन मॅक्सवेलने ५९ धावा केल्या. शार्दूल ठाकूरने ३, जसप्रीत बुमराहने २ आणि थंगरसू नटराजनने २, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ गडी बाद केला. शेवटच्या षयकात ऑस्ट्रेलियाला १३ धावा लागत होत्या. तर त्यांचे ९ गडी बाद झालेले होते. त्यामुळे शेवटची जोडी मैदानावर होती. त्याचवेळी दहावा गडी बाद झाल्याने ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला.
पहिल्या दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला होता. तो मात्र भारताला पार करता आला नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने एक दिवसीय सामन्यांची ही मालिका २-०ने जिंकली आहे. आज अखेरचा सामना होत आहे. त्यामुळे भारत हा सामना जिंकणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी सुरू केली. कर्णधार विराट कोहलीने ६३, रविंद्र जडेजाने नाबाद ६६ आणि हार्दिक पांड्याने नाबाद ९२ धावा केल्या. पांड्या आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागिदारी केली. त्यामुळेच भारताला ३०० हून अधिक धावा करता आल्या. अश्टन एगरने २ विकेट घेतल्या. तर, झाम्पा, अब्बॉट आणि हॅझलवूडने प्रत्येकी १ फलंदाजाला बाद करण्यात यश मिळविले.
—
धावफलक असा
भारत – ३०२/५
ऑस्ट्रेलिया – २८९/१०