नवी दिल्ली – गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानने स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आहे. मात्र, यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला असून गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे. पाकिस्तानने घटनाबाह्यरित्या हा दर्जा दिला असून पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान रिकामे करावे, असे भारताने बजावले आहे. पाकिस्तानने पीओकेमध्येही अतिक्रमण केले आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.