पुणे – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना भारताने ७ धावांनी जिंकला आहे. तसेच, तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकत विजय मिळविला आहे. इंग्लंड समोर विजयासाठी भारताने ३३० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ७८, शिखर धवनने ६७ आणि हार्दिक पांड्या ६४ यांनी उत्तम खेळी केली. इंग्लंडने खेळ सुरू केला. आणि तडाखेबंद फलंदाजी सुरू केली. अतिशय रोमांचक झालेल्या सामन्यात अखेर भारताने ७ धावांनी विजय मिळविला.
भारताच्यावतीने शार्दूल ठाकूरने सर्वाधिक ४, भुवनेश्वर कुमारने ३, टी नटराजनने १ गडी टिपला. इंग्लंडने ५० षटकात ९ गडी बाद ३२२ धावा केल्या. भारताने ही मालिका जिंकून इंग्लंडचा पराभव केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1376216769002541057