नवी दिल्ली – नीरव मोदी लवकरच भारताच्या हवाली होणार आहे. तसा निकाल युकेच्या न्यायालयाने दिला आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे.
पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) तब्बल २ अब्ज डॉलर्सची फसवणूक मोदी याने केली आहे. मोदी हा हिरे व्यापारी आहे. याप्रकरणात तो भारताला हवा आहे. त्याविरुद्ध तसा गुन्हे दाखल आहेत. त्याची भारतातील मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. मात्र, तो लंडलना फरार झाला होता. आता न्यायालयाच्या निकालानंतर त्याला भारताच्या हवाली केले जाणार आहे.