मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन यासंदर्भातील संकोच व संभ्रम कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. आता भाजपचे खासदार व मंत्र्यांनाही व्हॅक्सीन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजपासून (२ मार्च) खासदार व मंत्री आपापल्या कार्यक्षेत्रात जाऊन व्हॅक्सीन घेणार आहेत, असे सूत्रांकडून कळते.
अर्थात संसदेचे सत्र सुरू नसल्याने अधिकांश खासदार आपापल्या क्षेत्रातच आहेत. पण यात केवळ ६० वर्षांवरील खासदारांचाच समावेश असेल. किंवा ४५ ते ६० या वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांना व्हॅक्सीन घेता येईल.
कोव्हीन अॅपवर नाही पोर्टलवर नोंदणी
मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या लसीकरणाला पहिल्या दिवशी आनलाईन नोंदणीच्या समस्येचा सामना करावा लागला. अनेकांनी प्लेस्टोअरवर असलेल्या कोव्हीन अॅपवर नोंदणी केली, मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की कोन्हीन एप फक्त प्रशासकीय कामांसाठी आहे. व्हॅक्सीनसाठी नोंदणी करण्यासाठी पोर्टलवरच जावे लागेल. त्यामुळे दिवसभरात पोर्टलवरही ट्राफिक वाढले.
मंत्रालयाने पहिल्या दिवशी नोंदणी करणाऱ्यांची आकडेवारी तर दिली नाही, मात्र दुपारी १ पर्यंत १० लाख लोकांनी नोंदणी केली होती. याशिवाय व्हॅक्सीन घेण्यासाठीही लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व अनेक नेत्यांनी तसेच राज्यपालांनी लस घेतली.
आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, ‘पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेत्यांनी लस घेतल्यामुळे याबाबत जो अपप्रचार चालला होता, तो पूर्णपणे थांबला.’ विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने आपल्या राज्यात कोव्हॅक्सीन लावण्यास स्पष्ट नकार दिला होता.
कोव्हीन पोर्टलबाबत तक्रारी