नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती त्यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. त्यांची तब्ब्येत ठीक आहे.
नड्डा हे गेले काही दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. तसेच, ते येत्या २ ते ३ दिवसात तीन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते.