नाशिक – भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहर उपाध्यक्ष किरण पानकर, निलेश सानप, मध्य विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, सिडको विभाग अध्यक्ष मुकेश शेवाळे, पूर्व विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, राहुल कमानकर, करण आरोटे, रामेश्वर साबळे उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस विविध कामांच्या माध्यमातून नाशिककरांचे प्रश्न सोडवीत असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहे हे सर्वसामान्यांना लक्षात येऊ लागल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे युवक वर्गाचा कल वाढत आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रवेश घेतलेल्या या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अधिक बळकटी प्राप्त होणार असून नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हे नाशिक शहर व परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवितात. तसेच नाशिककरांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कायम अग्रेसर असते. या दृष्टीने नाशिक शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाची ताकद सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या वाढत असल्याचे यावरून दिसून येत असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या भावी राजकीय कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी अथर्व खांदवे, वैभव शिरसाठ, सागर शेजवळ, दीपक कुलकर्णी, अभिमन्य गुडघे-पाटील, ओमकार गोंद्रे, मयूर डोंगरे, गणेश गरगटे, प्रणव पानकर, संदीप दरेकर, शाहूराजे गुडघे,नितीन ओगदे, अमोल पाटील, वेदांत काळे, निरज पाटील, तुळशीदास गुडघे, सिद्धार्थ सांगळे, रोहित सूर्यवंशी, प्रशांत गाडेकर, उत्कर्ष डोके, उमेश स्नेहभक्त, बलराम चव्हाण, सागर वाघ, विवेक तुपे, स्वप्निल सांगळे, तेजस काके, अतुल अर्जुन, स्वामी मोरे, प्रवीण कापुरे, शुभम खैरनार, गौरव भडांगे, नवनाथ सूर्यवंशी, शुभम शिरसाठ, अक्षय श्रीखंडे, हेमंत मोरे, आदित्य शिंदे, विशाल भडांगे, साहिल तुपे, अजय भसरे, रोहन घोडके, निनाद भडांगे, बाबू मठ्ठी, स्वप्निल मुठाळ, विकी गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.