मध्यरात्रीला घरासमोर येऊन राडा
नाशिक – सिडकोतील भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांना सराईत गुंड सिद्धेश मथुरे याने फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मध्यरात्रीला घरासमोर येऊन शिवीगाळ करीत राडा घातला. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या फिर्यादीनुसार, सराईत गुन्हेगार सिद्धेश मथुरे याने सोशल मीडियावरुन नगरसेवक शहाणे यांना धमकावले. तर, शहाणे यांनी त्यास एका मार्फत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही मथुरे याने धमकावणे बंद केलं नाही. तर मध्यरात्रीला त्याने शहाणे यांना व्हिडीओ कॉल केला आणि कोयता व पिस्तुल दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मथुरे हा नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. काही महिन्यांपूर्वी डीजे चालकांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्ह्यात अटक झाली होती. दरम्यान, संशयित मथुरे यास अंबड पोलिसांनी अटक केली. तर पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी मथुरे यास पोलिसी खाक्या दाखवीत अंबड परिसरातून त्याची मिरवणूक काढली.