येवला – भारतीय जनता पक्षाच्यावतीने येवला तालुका भाजपा कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण शिबिराचा समारोप खा.डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या एकदिवसीय शिबिरात कार्यकर्त्यांसाठी विविध विषयांवरचे मार्गदर्शनपर शिबिर आयोजित केले गेले होते. त्यात विविध वक्त्यांचे उपस्थितांना मार्गदर्शन केले. येवला तालुक्याच्या नवनिर्वाचित भाजपा कार्यकर्त्यांना खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या शिबिराच्या समारोपात बोलतांना खा.डॉ.भारती पवार यांनी भाजपा कार्यकर्ता हा समर्पित भावनेने काम करणारा कार्यकर्ता असतो आणि पक्ष संघटनेत नेत्यापेक्षा कार्यकर्ता हा अधिक महत्वाचा बिंदू असून तो सर्वांना जोडून ठेवण्याचे काम करत असतो. कार्यकर्त्यांच्याच कामाच्या बळावर पक्ष प्रगती करतो व यशाच्या शिखरावर पोहोचतो. भाजपा कार्यकर्ता हा निरपेक्ष भावनेने राष्ट्रप्रेमाणे ओतप्रोत असलेला हाडाचा कार्यकर्ता आहे. अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरच आज भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वाधिक कार्यकर्ते असणारी पार्टी आहे. केंद्रात आणि अनेक राज्यात आज भाजपाची सत्ता आहे याचे सर्व श्रेय भाजपा कार्यकर्त्यानाच जाते असे प्रतिपादन खा.डॉ.भारती पवार यांनी मेळाव्याच्या समारोपप्रसंगी केले.
या मेळाव्यास जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष डॉ.नंदकुमार शिंदे , नितीन जाधव, संजय गाजरे, मनोज दिवटे, तुषार वाघमारे, प्रा.नानासाहेब लहरे, संतोष काटे, मिनानाथ पवार, बाळू मढवाई, दत्तू शिंदे, राम बडोदे, संतोष केंद्रे ,प्रशांत गोसावी, गोरखनाथ खैरनार, सौ.सारिका शेळके, सौ.संगीता दिवटे, रंजक ढोकळे, दत्ता सानप, भालचंद्र त्रिभुवन, जनार्धन गंडाळ, युनिस पटेल, दिवटे, किरण लभडे, सुनील सोमासे, महेश देशमुख, संभाजी दाभाडे, दीपक मढवाई, किरण लभडे, अशोक देवरे ,संजय भोसले, हरिभाऊ पुणे, गणेश गायकवाड, बाळासाहेब सताळकर, बाळासाहेब कुर्हे, अखिल शाह, अमर पांगुळ, राजू परदेशी , आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.