कळवण – भाजप तर्फे क्षेत्र सप्तशृंगी गड येथे पहिल्या पायरीवर मा.जिल्हाध्यक्ष विकास श देशमुख, तालुकाध्यक्ष दिपक खैरनार, जेष्ठ नेते सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, निंबा पगार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार व्यंकटेश गुप्ते यांना निवेदन देण्यात आले. मंदिर उघडावी या मागणीसाठी राज्यभर असे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात तालुका महामंत्री डाॅ. अनिल महाजन, सरचिटणीस विश्वास पाटील,एस.के पगार, युवा मोर्चा अध्यक्ष हेमंत पगार, उपाध्यक्ष हेमंत रावले, विनायक दुबे, शहराध्यक्ष प्रकाश कडवे, युवा मोर्चा कळवण शहराध्यक्ष चेतन निकम, लक्ष्मण कुलकर्णी, देव नाना अजय, राहुल बेनके,मनोहर कदम, माणिक सावंत, अमित दिक्षीत, आकाश बत्तासे,नंदू चित्ते ,प्रकाश मोरे, प्रविण कोतकर,दिनेश राजपूत, पुरोहित संघ,समाज बांधव बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.