नाशिक- महाराष्ट्र राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, बालिकांवर होणारे बलात्कार, कोवीड सेंटरमध्ये महिलांवर होणारे अतिप्रसंग या विरोधात राज्य सरकारला जागे करण्यासाठी पंचवटी कारंजा, महात्मा गांधी रोड, सिडको, नाशिकरोड, सातपूर भागात भाजपा महिला मोर्चाने आक्रोश आंदोलन केले. पंचवटी कारंजा येथे आंदोलन करणा-यांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर गुन्हे दाखल केले. या आंदोलनात महिलांवर अत्याचार होत असताना निर्लज्जपणे बघ्याची भूमिका घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, राज्य सरकार करतय काय ? खाली डोकं वरती पाय, जय भवानी-जय शिवाजी, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
या आंदोलनात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार प्रा.देवयानी फरांदे भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आडके, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, सुनील बागुल, प्रशांत जाधव, सुनील केदार, पवन भगुरकर, जगन पाटील, अमित घुगे, चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, गणेश गीते, रंजना भानसी, जगदीश पाटील, प्रियंका माने, अरुण पवार, सुरेश खेताडे, पुनम धनगर, दिगंबर धुमाळ, धनंजय माने, मनीष बागुल, विजय बनछोडे, ऋषिकेश आहेर, अनिल वाघ, उत्तम उगले, अंजली अभंगराव, वर्षा खांबेकर, हर्षद वाघ, सविता कुलकर्णी, लता राऊत, रोहिणी दळवी, क्षितिजा खटावकर, प्रीती उपाध्याय, मंजुषा लोहगावकर, प्रवीण भाटे, मयुर नाटकर, शोभा जाधव, करुणा गायकवाड,राहुल शिरसागर,निनाद पुजारी, आदींसह मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.