मुंबई – भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीची नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. या नोटीस मध्ये ३० डिसेंबरला हजर राहण्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर ही नोटीस पाठवल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान आतापर्यंत नोटीस मिळाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करतांना तुमची ईडी तर आमची सीडी असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ही नोटीस बजावल्यानंतर आता कोणती सीडी ते बाहेर काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.