नाशिकला आल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले की, माझी मंत्रीपदाची अपेक्षा नाही, उत्तर महाराष्ट्राचा विकास व्हावा, इतकीच इच्छा आहे. राष्ट्रवादीत साधा कार्यकर्ता म्हणूनही काम करायला आवडेल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. आज रस्त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं, ब-याचशा भाजप नेते, कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आता दररोज कार्यकर्त्यांचे प्रवेश होतील, यावेळी त्यांनी फडणवीस लवकरात लवकर कोरोनातून बरे व्हावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
सीडी या शब्दाचा मी फक्त भाषणात वापर केला, येत्या काळात काय काय घडामोडी होतील ते कळेल. पक्षांतर बंदी कायद्याचा भंग न होता, कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा असल्यास जळगावातील महापालिका, नगरपालिका, सहकारी संस्थांमध्ये सत्तांतर होईल असेही ते म्हणाले. गेली चार वर्षे भीतीच्या छायेत वावरलो, कधी ईडी, कधी अँटी करप्शन मागे लागेल याची भीती होती, पण आता माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलंय, आता मी लोकांना टेंशन देणार असेही ते म्हणाले.
पहा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी असे केले ‘खडसेंचे’ स्वागत
मुंबई – भाजपला सोडचिट्ठी देऊन अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे पुन्हा जळगावला जात असतांना परतीच्या प्रवासात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. परतीच्या प्रवासात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे कारने जळगावला जात असतांना वाटेत ठीकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. मुंबईमधून निघताच विक्रोळी आणि मुलुंड येथील मार्गावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कल्याण बायपास येथे देखील कार्यकर्त्यांनी खडसेंचे स्वागत केले.