नवी दिल्ली – भाजपानं दुसऱ्या टप्प्यातले संघटनात्मक बदल केले असून, त्यानुसार नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या प्रभारीपदाची जबाबदारी कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांच्याकडे दिली आहे. तर राष्ट्रीय प्रवक्ते विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी, तर राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचं सहप्रभारीपद मिळालं आहे. भाजपाचे महासचिव सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशाचं सहप्रभारीपदी कायम असेल. व्ही. मुरलीधर यांच्याकडे आंध्र प्रदेशाचं प्रभारीपद, विजया रहाटकर यांच्याकडे दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीचं प्रभारीपद दिलं आहे.
पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी कैलास विजयवर्गीय यांना, तर सहप्रभारी म्हणून भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय आणि अरविंद मेनन यांना नियुक्त केलं आहे. भाजपचे उपाध्यक्ष राधामोहन सिंह उत्तर प्रदेशचे प्रभारी, बैजयंत पंडा दिल्ली आणि आसामचे प्रभारी, भूपेंद्र यादव बिहार आणि गुजरातचे प्रभारी, डी पुरंदेश्वरी ओडीशा आणि छत्तीसढच्या प्रभारी, दुष्यंत गौतम पंजाब, चंदीगढ आणि उत्तराखंडचे प्रभारी, दिलीप सैकीया झारखंड आणि अरुणाचलचे प्रभारी, अविनाश राय खन्ना हिमाचल प्रदेशचे प्रभारी, सी पी राधाकृष्णन केरळचे, तर राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांची मणिपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.