नाशिक – पूजा चव्हाण (वय २२) हिने पुण्यात ८ फेब्रुवारीला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.पण, या प्रकरणात १८ दिवस उलटल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे भाजपने हे आंदोलन केल्याचे भाजपच्या आमदार सीमा हिरे सांगितले. त्यांच्याच नेतृत्वाखाली त्रिमुर्ती चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी हातात फलक घेऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या आमदार हिरे सह आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनात भाजपच्या महिला पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.