मुंबई – शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने आता मिशन मुंबई महापालिका सुरू केले आहे. त्यासाठीच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत स्वबळावर भाजपाचा महापौर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे भातखळकर यांनी मुंबई भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटले आहे.
महापालिकेवर २०२२ मध्ये नक्कीच भगवा फडकेल मात्र तो शिवसेनेचा नाही तर भाजपचा असेल, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. युवा मोर्चाने प्रत्येक बूथमध्ये ५० युवा आणि महिला मोर्चाने १०० घरात महिलांना जोडावे. यावेळी आपला विजय निश्चितच आहे, असेही फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.