जळगाव – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्या समर्थकांसह गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांचे समर्थक व खडसे हे आज रात्रीच मुंबईला रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहे. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
मुक्ताईनगरमध्ये भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण…तुम्ही ठरवाल तेच धोरण अशा मजकुराचे बँनर झळकले आहे. त्यात भाजपचे कमळही गायब आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातो. खडसे यांच्या सुन खासदार रक्षा खडसे या तूर्त प्रवेश करणार नसल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान खडसे हे भाजप सोडणार नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.