नाशिकरोड – नाशिक जिल्हा बॅंकेत चार वर्षांपासून अडकलेले भविष्यनिर्वाह निधीचे रक्कम मिळावी तसेच बॅक गैरकारभाराची चौकशी करुन दोषी असलेल्या अधिकारी यांचे विरुध्द गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी कुंदेवाडी (ता. सिन्नर) येथील मधुकर माळी व सिडकोतील भालचंद्र धामणगावकर यांनी कुटुंबासह आणि आॅल इंडिया ट्रेड युनियन कॉग्रेस (आयटक) वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर गांधी जयंती पासून बेमुदत धरणे आंदोलनांस सुरु केले आहे.
त्यांनी दिलेला निवेदनांत म्हटले की, माळी व धामणगावकर हे महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सहकारी पतसंस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सेवानिवृत्तीनंतर भविष्यनिर्वाह निधीचे प्रत्येकी बारा लाख रुपये दोघांना मिळाले. सहकार खात्याच्या नियमानुसार ही रक्कम पतसंस्थेने जिल्हा बॅंकेच्या देवळाली नाका शाखेत ठेवली. या पैशांसाठी बॅँकेत चार वर्षांपासून चकरा मारुनही रक्कम मिळत नाही. मुलाबाळांचे शिक्षण, विवाह, संसार आदी कारणांसाठी पैशांची गरज असतानाही बॅँक पैसे देत नसल्याने हे ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत.
तसेच आयटकनी दिलेला निवेदनांत म्हटले आहे की, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक हा राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असलेली शासकिय बॅक असून सहकार नियमानुसार जिल्हातील सर्व सहकारी संस्थेचे व्यवहार या बॅकेच्या माध्यामातुन केले जाते. त्यामुळे शेतकरी व कामगार यांचे या बँकेच खाते आहेत. त्यामुळे शेतकरी, सहकारी संस्थाचे कामगार, कर्मचारी पगार, भविष्य निर्वाह निधी पैसे तसेच जेष्ठ नागरिकांचे ठेवी या बॅकेत आहेत. नोटबंदी नतंर सर्व बॅकांचे कारभार पुर्वपदावर आले.परंतु जिल्हा बॅकेत सुधारणा झाली नाही शेतकरी, कामगार वर्ग यांचे कोटीमध्ये बॅकेकडून पेसे येणे बाकी आहे चार वर्षापाून आश्वासना पलिकडे काही बॅक देत नाही. ज्यानी बॅकेची आर्थिक घडी बिघडवली त्यांनी गैर कारभार केला त्याचा कामकाजाची चौकशी होवून दोषी आढळल्यास त्याचावर गुन्हे दाखल करा.
यावेळी व्ही.डी. धनवटे, अरुण म्हसके, एन.आर. खतिब, पी.आर. पराठा, पी.एन. पगार, डी.आर. घोडे, भास्कर लांडगे, रघुनाथ ताजनपुरे, दत्ता चौधरी, भाऊसाहेब पाळदे, बाळासाहेब गोसावी, सुरेश कांबळे, महेश कदम, महेश लांडगे आदि उपस्थित होते.