गोरखपूर (उत्तर प्रदेश) – अंगावर काटा आणणारी भयानक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच आपल्या दीड वर्षाच्या मुलाला पाण्यात बुडवून मारले. मात्र आईने मुलाच्या हत्येचे कारण ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आपला मुलगा मानसिक रूग्ण असून खूप त्रास देत होता, असे तिने पोलिसांना सांगून चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपी गावचे रहिवाशी आनंद स्वरूप सिंह यांची विवाहीत मुलगी मनोरमा ही आपला लहान मुलगा अनिकेतला घेऊन माहेरी आली होती. रात्री आठच्या सुमारास अनिकेत हा घरातून बेपत्ता झाला होता.
खूप शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही, त्यानंतर आनंद स्वरूप यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांच्या तपासणी दरम्यान मुलाचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. मनोरमाने म्हणजेच मुलाच्या आईने त्याला ठार करण्याचा कट रचला होता. कारण तिला आधीच एक मुलगा आणि एक मुलगा असून आता हा मनोरुग्ण मुलगा नको होता.
पोलिस चौकशीत मनोरमा म्हणाली की, तिने मुलाला तलावात फेकण्याचा कट रचला होता, परंतु वडिलांनी व इतरांनी दाराजवळ बघीतल्याने तिला तसे करता आले नाही. तिला संधी मिळताच तिने अनिकेतला छतावर नेऊन पाण्याच्या टाकीत टाकले आणि झाकण बंद केले. त्यात गुदमरून अनिकेतचा टाक्यात बुडून मृत्यू झाला.
यानंतर पोलिसांनी मनोरमाला अटक केली आहे. मात्र आपल्या निर्दोष मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याची तिला खंत नाही. मनोरमाने आपला मुलगा एक मानसिक रुग्णदेखील असल्याचे सांगितले. त्याच वेळी, या प्रकरणात मुलाचे आजोबा आणि दोन मामी चौकशीत निर्दोष असल्याचे आढळल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.