नाशिक – भद्रकाली पोलिसांनी ५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचे ३८ मोबाईल २ चोरट्याकडून हस्तगत केले आहे. भद्रकाली पोलीसाच्या गुन्हे शोध पथकाने सोमवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
या चोरी प्रकरणात शफीक तौफिक शेख (वय ३५ रा.कमलापुरा मालेगाव नाशिक ) सध्या राहणार मोठा राजवाडा जुने, नाशिक तर दुसरा संशयीत मोहमद आमीन अब्दुल रहीम अन्सारी (वय ४० रा नया पुरा अरब चौक मालेगाव ) या आरोपींना २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे, गुन्हे शाखेचे दत्ता पवार, गुन्हे शोध पथकाचे न्यानेश्वर मोहिते यांनी सदर सशयितांची चौकशी केली. त्यानंतर मोबाइल हस्तगत केले. या तपासाची माहिती सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर कारवाई बी. एन. जाधव, आर बी कोळी, एन. डी, जाधव, एस. बी. म्हसदे, एम. एस. सय्यद, एस. पी. निकुंभ आदच्या पथकाने केली.