भगूर – आपण वाहन चालवितांना कसे वाहन चालतो-समोर येणारा कसा वाहन चालवतो यातून अपघाताची शक्यता जास्त असते त्यामुळे प्रत्येक वाहन रिक्षाचालकांनी थर्ड पार्टी का होईना इन्शुरन्स पडलं पाहिजे कारण त्यामुळे तुमच्यावर कुठली कारवाई होणार नाही. याची दक्षता घेतली पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपायुक्त रमेश पवार यांनी राष्ट्रीय रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या प्रसंगी केली. तसेच आपल्या वाहनावरील परमिट असल्याने नियमाचे पालन करा, आपल्या गाडीचे कागदपत्र जवळ ठेवा, प्रवासी वाहतूक करताना आपल्या वाहनात क्षमता पेक्षा जास्त प्रवासी टाकू नये. वाहतूक नियमाचे पालन करा.असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मार्गदर्शन प्रसंगी सांगितले. आपल्या येथील नाशिक रोड वाहतूक शाखा व शिवसेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेच्या वतीने भगूर बस स्टॉप याठिकाणी राष्ट्रीय सडक सुरक्षा वाहतूक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उप आयुक्त रमेश पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कुमार सूर्यवंशी, भगूर नगर परिषदेचे नगरसेवक दिपक बलकवडे, नगरसेवक मोहन करंजकर, महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू विशाल बलकवडे, वृक्षमित्र तानाजी भोर,शिवसेना भगूर शहर उपाध्यक्ष नितीन करंजकर आधी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शाल, गुलाबपुष्प देऊन भगूर बस स्टॉप रिक्षा-टॅक्सी चालक-मालक सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपआयुक्त रमेश पवार व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कुमार सूर्यवंशी यांनी उपस्थित रिक्षा -टॅक्सी चालक मालकांना वाहतुक नियमाविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगूर बस स्टॉप परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम करंजकर यांनी केले. तर आभार योगेश रहाणे यांनी मानले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार विजय गवते,पोलीस नाईक अनिल पवार, पोलीस अंमलदार राहुल बलकवडे, अरुण गाडेकर,तनजीन खान यांच्यासह भगूर बस स्टॉप रिक्षा- टॅक्सी चालक-मालक सेनेचे अध्यक्ष विजय मराठे, उपाध्यक्ष छोटू उकरडे, संदीप गायकवाड, सुनील गवळी,शशिकांत देशमुख, राजू दिवटे, सुनील ससाणे,सचिन आसावा, रमेश कांबळे, कैलास गवळी,दिलीप वाघ, पप्पू ताजनपुरे, संतोष कस्तुरे, गणेश वाघ, गजानन सोंडकर, वसीम सय्यद, रतन साळवे, अनिल दिवटे, जालिंदर शहाणे,विजय कलेटी, राकेश ताजनपुरे, किरण कापसे, महिंद्रा गायकवाड, वसीम खान, आदींसह रिक्षा टॅक्सी चालक मालक उपस्थित होते.