भगूर – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी महाराष्ट्र केसरी निवडीसाठी नाशिक जिल्ह्यला तालीम संघाच्या वतीने जिल्हा निवड चाचणी स्पर्धा भगूर येथील न. ल .बलकवडे क्रीडा संकुल येथे पार पडल्या. या चाचणीसाठी जिल्हाभरातून १५० नामवंत पहिलवान सहभागी झाले होते. या निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ वसंत नगरकर, गोरखनाथ बलकवडे, दिनकर पाटील, प्रेरणा बलकवडे, रविंद्र मोरे, बाळू नवले, प्रा. दीपक जुंद्रे, विशाल बलकवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रण्यात आला. या निवड चाचणीसाठी ५७,६१,६५,७०,७९,८६,९७ खुला अशा विविध वजनगटातील या निवड चाचण्या पार पडल्या. यावेळी पंच म्हणून चेतक बलकवडे, संजय गायकवाड, रामप्रवेश यादव, रोहित आहिरे, राहुल कापसे आदींनी यांनी काम बघितले.
स्पर्धेत गादी व माती विभाग अशा दोन विभागात पैलवानांची निवड करण्यात आली यामध्ये गादी विभागात ५७ किलो वजनी गटात – पवन ढोन्नर, नाशिक, ६१ किलो – मनोज घिवंदे ,दिंडोरी६५ किलो- भाऊराव सदगीर,सिन्नर, ७० किलो सुरज गबाले,नाशिक,७९ किलो बाळू बोडके,नाशिक
८६ किलो-मनोज कातोरे,नाशिक, ९२ किलो- गणेश मोरे,नाशिक, ९७ किलो- प्रकाश बिडगर,चांदवड
खुला गट- हर्षवर्धन सदगीर,नाशिक तर माती विभागातील ५७ किलो वजनी गटात – गणेश कडनोर, मालेगाव, ६१ किलो – सोमनाथ ढोन्नर,नाशिक, ६५ किलो- दिनेश बिन्नर,इगतपुरी,७० किलो- बाळू जुंद्रे,इगतपुरी, ७४ किलो- अनिल ढोकणे,इगतपुरी, ७९ किलो- संग्राम गिडगे, मनमाड, ८६ किलो- ज्ञानेश्वर खेमनार, नांदगाव, ९२ किलो- गणेश बेनके,भगूर, ९७ किलो- मोहम्मद सैफ तारीक हुसेन,मालेगाव तर खुल्या गटातून – राहुल चौगुले,सिन्नर यांची निवड करण्यात आली.