नाशिक : भंगार गोडावून मध्ये काम करणा-या तीस वर्षीय विवाहीतेवर सहकारी असलेल्या तरूणाने बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयीताचा शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून महामार्गावरील एक्स्लो पॉईंट परिसरातील दातारनगर भागात ही घटना घडली. पीडित महिला आणि संशयीत एकाच भंगार गोडावून मधील कामगार असून मंगळवारी (दि.२) मालक कामानिमित्त गोडावून मधून बाहेर गेला असता संशयीताने हे कृत्य केले. पीडिता एकटी असल्याची संधी साधत संशयीताने कच-याच्या ढिगा-या पाठीमागे महिलेस ओढून नेत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. ही घटना पीडितेने आपल्या कुटूंबियास कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक चौधरी करीत आहेत.