लॉस एंजलिस – ‘ब्लॅक पँथर’ म्हणून प्रसिद्ध असलेला हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमनने आज जगाचा निरोप घेतला आहे. चार वर्षांपासून त्याची सुरु असलेली कॅन्सरची झुंज आज अखेर अपयशी ठरली. त्याच्या निधनाने कलाकारांसह चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमने जगप्रसिद्ध ‘ब्लॅक पँथर’ची भूमिका साकारली. आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत असतांना येथील राहत्या घरी शनिवारी (२९ ऑगस्ट) वयाच्या ४३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मार्वेल स्टुडिओ फिल्मचा लाडका अभिनेता म्हणून त्याची ख्याती होती. त्याच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्सने त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. २०१३ साली आलेल्या स्पोर्ट्स ड्रामा ४२ यात त्याने पहिली भूमिका साकारली होती. सोशल मिल्याच्या माध्यमातून देशभरातील चाहत्यांनी त्यास श्रद्धांजली अर्पण केली आहे. मार्शल चित्रपटापासून ते ‘डा ५’ या चित्रपटापर्यंत बरेच चित्रपट त्याने कॅन्सरसाठीची शस्त्रक्रीया आणि केमोथेरपी सुरु असताना चित्रित केले होते. आणि ‘ब्लॅक पँथर’ या चित्रपटातील पात्राने त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीरवर नेऊन ठेवले होते. मार्वेल स्टुडिओच्या ब्लॅक पँथरमध्ये सुपरहिरोची मुख्य भूमिका साकारल्यानंतर त्याने हॉलिवूडमधले सर्वोच्च शिखर गाठले होते. २०२० च्या सुरुवातीला स्पाईक ली’ज डा ५ ब्लड्स या चित्रपटाचे शूटिंग केले होते. २०२१मध्ये नेटफ्लिक्सच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होणार असून जगभरातील चाहत्यांसाठी त्याची शेवटची आठवण असणार आहे. ट्विटरवर जगभरातील चाहत्यांकडून त्याची आठवण म्हणून #WakandaForever #RIPLegend #ChadwickBoseman हे काही हॅशटॅग्स वापरत ट्वीट केले आहेत.