नवी दिल्ली – आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकांचे सकाळचे वेळापत्रक खूपच व्यस्त असते. अशा परिस्थितीत, आरोग्यासाठी चांगला भरपेट आणि पौष्टीक ब्रेकफास्ट (न्याहारी किंवा नाश्ता) उत्तम ठरतो.
आज आपण ब्रेकफास्ट विषयी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत…
फळांसह ओट्स
काही जण ओट्स रात्री दुधात भिजवतात, आपण दूधाऐवजी सोया किंवा बदामाचे दूध वापरू शकतो, तसेच यात ओट्समध्ये सकाळी काही ताजी फळे घालावीत. त्यामुळे तुमचा ओट्स आणि फळांचा ब्रेकफास्ट चांगला होतो.
फळे, दूध, सूकामेवा
जर आपल्याला खूप भूक लागली असेल आणि सकाळी कमी वेळ मिळाला असेल तर आपली आवडती फळे उदा. आंबा, केळी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी तसेच थोडे दूध आणि ओट्स एकत्र करावे. त्यात काही बदाम किंवा काजू असा सुकामेवा देखील घालता येऊ शकतो. आपल्याला त्यात नैसर्गिक गोडपणासाठी गूळ देखील टाकू शकता.










