लंडन – ब्रिटनसह युरोपातील अनेक देशात कोरोना साथीच्या दुसर्या लाटेचा कहर झाला असून अनेक उपाययोजना करूनही या प्राणघातक विषाणूचा नाश होत नाही. गेल्या २४ तासांत ब्रिटनमध्ये १२४८ जणांचा बळी गेला आहे तर ४८ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत २ कोटी ९ लाखाहूनही जास्त लोकांना प्रथम कोरोनाची लस दिली गेली आहे. ८ डिसेंबरपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. एवढेच नाही तर चीनमध्ये कोरोना संक्रमण होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या महिन्यात नवीन विषाणूचा फैलाव झाल्यापासून ब्रिटनमध्ये साथीचे प्रमाण वाढले आहे. येथून अनेक देशांमध्ये हा ताण आला आहे. विषाणूचे हे नवीन रूप अधिक संसर्गजन्य असल्याचे नोंदवले गेले आहे. आतापर्यंत ३२ लाख ६० हजारांहून अधिक लोकांना ब्रिटनमध्ये संसर्ग झाला आहे. त्यापैकी ८६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिबंध करण्यासाठी या देशात कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, परंतु संसर्गाला आळा बसलेला नाही. चीनच्या उत्तर भागात संक्रमित लोकांची संख्या वाढत आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, गेल्या २४ तासांत १४४ नवीन प्रकरणे आढळली. सध्या १ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जर्मनीत बाधितांचा आकडा २० लाखांवर गेला आहे. तर आतापर्यंत ४५ हजार जणांचा बळी गेला आहे. तसेच, पाकिस्तानातही दिवसेंदिवस बाधित वाढत आहेत. एकाच देवसात २४१७ नव्या कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.