लंडन : जेम्स बॉण्डचे आकर्षक लहानपणापासून सर्वांनाच असते. अगदी शाळेत जाणारी मुले देखील आपल्या मित्रांना म्हणतात, माय नेम इज जेम्स बॉण्ड! मात्र, ब्रिटनमध्ये लहान मुलांचे जेम्स बॉण्ड बनण्याचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. कारण हेरगिरी कायद्यात ब्रिटिश सरकारने मोठा बदल केला असून त्यात मुलांना जेम्स बॉण्ड म्हणजेच
गुप्त एजंट बनवता येईल.
मुलांकडून हेरगिरी केली जाऊ शकते. इतकेच नाही, तर मुलांना पालकांविरुद्ध हेर म्हणूनही वापरता येते. आता काही संस्था मुलांचा हेरगिरी करिता वापर करण्यास सक्षम असतील. मुलांचा हेर म्हणून विशेषतः वापर करू शकणार्या संस्थांमध्ये पोलिस, एमआय, नॅशनल क्राइम एजन्सी, जुगार आयोग, काउंटी आणि गुप्त परिषद, पर्यावरण संस्था आणि अन्न मानक एजन्सीचा समावेश आहे.
ब्रिटनमध्ये विशिष्ट परिस्थितीत मुलांवर त्यांच्या पालकांविरूद्ध हेरगिरी करण्याची तरतूद आहे . यात १६ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध हेरगिरी केली जाणार नाही. तथापि, १६ वर्षावरील मुलांकडून त्यांच्या पालकांविरूद्ध विशेष परिस्थितीत हेरगिरी करून घेतली जाऊ शकते. मात्र यालाबाल आयुक्तांनी आक्षेप घेतला असून ब्रिटेनचे चिल्ड्रेन्स कमिशनर लाँगफिल्ड म्हणाले की, हेरगिरीच्या कामात मुलांवर बंदी घालावी.