वॉशिंग्टन ः कोरोना संसर्गामुळे ब्राझिलमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर तपासण्या कमी करण्यात आल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये वाढत्या रुग्णांमुळे इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न यांनी सांगितलं, की शनिवारी (२७ फेब्रुवारी) दोन नवे सामुहिक संसर्गाची पुष्टी करण्यात आली आहे. न्यूझीलंडचं सर्वात मोठं शहर ऑकलँडमध्ये लॉकडाउन हटवल्यानंतर पुन्हा एकदा एका आठवड्यासाठी लॉकाडउन लावण्यात आलं आहे.
ब्रेसीलियामध्ये लॉकडाउन
ब्राझिलच्या ब्रेसीलियामध्ये २४ तासांचं लॉकाडाउन लावलण्यात आले आहे. काही शहरांत रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे. जवळपास १२ शहरांमध्ये रुग्णांसाठी खाटांची कमतरता जाणवत आहे. रशियामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे ११,५३४ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४.२३४,७२० झाली आहे.
न्यूझीलंडमध्ये इशार्याचा स्तर वाढवला
आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, न्यूझीलंडमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे इशार्याचा स्तर वाढवण्यात आला आहे. ऑकलँडमध्ये कोरोना अलर्टचा स्तर एकवरून तीनपर्यंत करण्यात आला आहे. इतर ठिकाणी अलर्टचा स्तर दोन आहे. न्यूझीलंडमध्ये आवश्यक वस्तू खरेदीसाठी परवानगी असेल, असे पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेत तपासण्यांमध्ये घट
पीटीआयच्या वृत्तानुसार, अमेरिकेत आता प्रतिदिन होणा-या कोरोना तपासण्यांमध्ये २८ टक्के घट झाली आहे. संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या लॉस अँजलिस काउंटीमध्ये काही आठवड्यांपूर्वी प्रति आठवडा ३,५०,००० हून अधिक लोकांची कोरोना चाचणी होत होती. त्यात घट झाली आहे. अमेरिकेत तपासणी कामाचे नेतृत्व करणारे अधिकारी डॉ. क्लेमेन्स हाँग यांनी सांगितले की, आम्ही खूपच लवकर शंभर किलोमीटर प्रतितासाच्या वेगावरून २५ किलोमीटर प्रति तास या वेगावर पोहोचलो आहोत.