रियो दि जिनेरिओ – जगात कोरोना संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ९ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक आहे. तर मृतांची संख्या २० लाख ३२ हजारांपेक्षा जास्त आहे. तसेच या साथीच्या रोगातून मुक्त झालेल्याची संख्या ६ कोटी ७८ लाख इतकी आहेत. एकीकडे युरोपात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलमधील परिस्थिती सातत्याने ढासळत आहे. पाच दिवस सतत देशात ६० हजाराहून अधिक नवीन रुग्ण प्रकरणे नोंदवली गेली असून एका दिवसात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मागील वर्षा जानेवारी महिन्यापासून जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू झाला वर्षाअखेर परिस्थिती सुधारात असताना पुन्हा नव्या वर्षात जगात आतापर्यंत २ कोटी ११ लाख लोक कोरोना बाधीत असून त्यापैकी १ कोटी १ लाख लोक गंभीर अवस्थेत आहेत. वास्तविक पूर्वीची परिस्थिती सुधारत असल्याचे दिसते, परंतु अचानक नवीन विषाणूमुळे रुग्ण प्रकरणे आणि मृत्यूची संख्या आणखी वाढत आहे. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पूर्वीपेक्षा अधिक तपासण्या केल्यामुळे प्रकरणे वाढत आहेत. मृत्यूच्या वाढत्या संख्येबद्दल ब्राझील सरकारने चिंता व्यक्त केली असून यापुढे लॉकडाऊनचे नियम पुन्हा कठोर करण्याचे संकेत दिले आहेत.