ब्राझिल – ब्राझिलमध्ये सध्या कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असून यावर तोडगा म्हणून ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एस्ट्राजेनेका लसीच्या २० लाख डोसची मागणी केली आहे.
कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये ब्राझिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशावेळी या तुटवड्यामुळे तेथे सध्या काळजीचे वातावरण आहे. सरकारवर नागरिक दबाव टाकत आहेत. सरकारी पातळीवर याबाबत पर्याय सुरू आहेत, हे सांगण्यासाठी येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राची प्रतही दाखवण्यात आली. दरम्यान, ब्राझिलमध्ये विरोधकांनी या मुद्द्यावरुन राष्ट्रपतींवर टीका केली आहे. लस उपलब्ध नसल्याने येथील लसीकरण मागे पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता ब्राझिल भारताकडून लस कधी मिळते, याची वाट पहात आहे.