हिमालयाच्या पर्वत रांगेतील नजरेला सुखावणारे असे निसर्ग सौदंर्य बघायला कुणाला आवडणार नाही ? ज्यांना ट्रेकची आवड आहे असे ट्रेकर्स वर्ष–दोन वर्षातून एकदा तरी निसर्ग फेरीची आपली आवड किंवा हौस ट्रेकच्या माध्यमातून भागवून घेत असतात. नाशिकच्या एन.बी.टी. महाविद्यालयात शिकणारी मनाली देवरे ही त्यापैकीच एक. मनमाड येथील डॉ.विवेक गुजराथी आणि त्यांची पत्नी सौ.नेहा गुजराथी हे दाम्पत्य तर या मोहीमेवर आपली आठ वर्षाची कन्या कु.काव्या हिला सुध्दा सोबत नेत असतात. यांच्यासह सौ.प्राची चेतन गुजराथी, मनमाड या मंडळींनी ‘ट्रेक द हिमालयाज‘ या संस्थेच्या माध्यमातून अनलॉक काळात म्हणजे जानेवारी महिन्यात ‘ब्रम्हताल‘ हा विंटर ट्रेक पुर्ण केला. त्यांच्या या ग्रुपसोबत असलेल्या बंगलोरच्या कमलेश बेदमुथाने यु–टयुबच्या माध्यमातून इथल्या निसर्गाचे दर्शन घडविणारा सुंदर असा व्हिडीओ आता पोस्ट केला आहे. बघा हा व्हिडिओ….