नाशिक – जिल्ह्यातील गोदावरीचे उगमस्थान तसेच देशा, विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निसर्गरम्य वातावरणाने वेढलेल्या त्रंबकेश्वर परिसरातील ब्रम्हगिरी तसेच इतर ठिकाणी अवैधरित्या गौण खनिज वाहतूक तसेच उत्खनन अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे महसुल प्रशासन तसेच पोलिस विभाग डोळेझाक करुन यास अप्रत्यक्षपणे सहकार्य करत आहे. या सर्व गैरप्रकारावर कारवाई करावी अशी मागणी कर्तव्यशील सामाजिक संस्थेचे वैभव राजाराम देशमुख यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, खनिज वाहतूक तसेच उत्खनन कारण्यासाठी संबधित गुन्हेगार यांना महसूल विभाग तसेच पोलिसांचा कुठलाही धाक राहिलेला नाही. देशातील पवित्र ज्योर्तिलिंग असलेल्या त्रंबकेश्वर शहर तसेच परिसराला याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे सरकारचा मोठ्या प्रमाणात महसुल बुड़त आहे.