नाशिक – कोविड १९ या जागतिक महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट असतानाही अंबड औद्योगिक वसाहतीतील सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनच्या अनेक कारखान्यांमधे बोनस करार संमत करण्यात आला आहे. बोनस मिळणार असल्याने अनेक कामगारांची दिवाळी गोड होणार असून कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लॉकडाऊन मुळे एकीकडे पगार कपात, कामगार कपात होत असताना दुसरीकडे मात्र पगार वाढीसह बोनस जाहीर झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन असलेल्या अनेक कारखान्यांमधे बोनस जाहीर करण्यात येत आहे. कामगाराना २० हजार ते ५६ हजार इतकी बोनस रक्कम मिळाली असून कामगार मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. बोनस मिळू लागल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. करार यशस्वी होण्यासाठी कंपनीतील व्यवस्थापनाची भूमिका सकारात्मक राहिली. सदर करार करण्याकरिता युनियनच्यावतीने डॉक्टर डी.एल. कराड, सिताराम ठोंबरे व कंपनीतील कमिटी मेंबर यांनी सहभाग घेतला.
अंबड औद्योगिक वसाहती कंपन्या मधील बोनस असा
लिंग्राड प्रा ली – ५० हजार ते ५६ हजार
ब्लु क्रॉस लँबोरिटीज प्रा. लि. – २८ हजार
ऍडम फेब्रिवर्क प्रा. लि. – ३७ हजार
अल्फ इंजिनिअरिंग – ३३ हजार
नाशिक ऑटोटेक प्रा. लि. ३३ हजार
आर्ट रबर इंडस्ट्रीज – २४ हजार
सुमो ऑटोटेक प्रा. लि – १६ हजार
जगदीश इंजिनीअरिंग – १६ हजार
सुदाल इंडस्ट्रीज – १२ हजार ५००